Saturday, 12 December 2015

चेट्टीनाड मशरूम मसाला ....... by Kirti Pataskar

चेट्टीनाड  मशरूम  मसाला 



२६ नोव्हेंबर २०१५ हा दिवस माझ्या आयुष्यातला "dream  coming true " ठरला . झी मराठी च्या आम्ही सारे खवय्ये साठी दुसऱ्यांदा माझा एपिसोड शूट होणार होता आणि साक्षात प्रशांत दामले …. a legend …ह्यन्न भेटण्याची संधी मिळणार होती . एपिसोड चांगला शूट झाला . त्यात २ recipes बनवल्या . त्यातली हि एक recipe तुमच्यासमोर सादर करत आहे . 

चेट्टीनाड हा तामिळनाडू मधील एक प्रांत आहे आणि त्याचं cuisine फारच प्रसिद्ध आहे. चेत्तीनाड मश्रूम मसाला साठी लागणारे साहित्य आणि क्रुति. 

साहित्य:

चेत्तीनाड मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

लाल सुक्या मिरच्या 
धने  ०१ छोटी वाटी 
जिरे  ०१ छोटी वाटी 
किसलेले खोबरे (सुके)  अर्धा वाटी 
लसणाच्या पाकळ्या   ५-६
छोटे कांदे  २-३

भाजी साठी लागणारे साहित्य :
तेल 
मोहरी  
कडीपत्ता  १०-१२ पाने 
हिंग  अर्धा टी स्पून 
हळद  ०१ tea स्पून 
चिंचेचा कोळ  ०२ मोठे चमचे '
मशरूम   पाव किलो 
मीठ  चवीनुसार 










कृती :
प्रथम मसाल्याचे वरील सर्व साहित्य भाजून घ्यवेत. त्यात तेल घालू नये . भाजून थंड झाल्यावर  मिक्सर मधून काढून त्याची पावडर करून घ्यावी . त्यानंतर कढई  मध्ये  तेल  गरम करून त्या मोहरी , हिंग , कडीपत्ता घालावा . 




नंतर त्यात मश्रूम, चिंचेचा कोळ  घालावा . झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी . त्या नंतर त्यात मीठ,हळद आणि चेट्टीनाड  मसाला घालावा व परत वाफ आणावी . भाजी शिजून तयार झाल्यावर हि गरम चपात्या ,भाकरी अथवा भाताबरोबर खावी . 










Photography courtesy: Abhishek Surve


No comments:

Post a Comment